मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात झालीय. इंधन कपातीचा आजचा सव्वीसावा दिवस आहे. पेट्रोल प्रतिलिटर १७ पैशांनी तर डिझेलचा दर तर १६ पैशांनी कमी झालेत. पेट्रोलचा दर ८३.०७ रुपये एवढा तर डिझेलचा दर ७५.७६ रुपये एवढा झालाय. गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीमुळे इंधन दरात कपात होतेय.


20 टक्के घसरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्री बाजारात कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ला ब्रेंट क्रूड 86.74 डॉलर प्रति बॅरल होतं.


ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 2018 ला घसरण होऊन 69.70 डॉलर प्रति बॅरल झालं. WTI क्रूड देखील 20 टक्क्यांनी कमी होऊन 65.60 डॉलर प्रति बॅरल झालंय.


आंतरराष्ट्रीय बाजारातील पंधरवड्यात सुरू असलेल्या किंमतीवरून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल डीझेलच्या दरातील चढउताराचा हिशोब ठरवतात.


या हिशोबानुसार तर भारतात पुढच्या पंधरवड्यात पेट्रोल डीझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.


21 दिवसांपासून घसरण 


गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल डीझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेयं.


मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 76.22 रुपये प्रति लीटर आहे.


केंद्र सरकारने किंमती केल्यानंतर शुक्रवारी सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कपात झाल्याचे पाहायला मिळतंय.


दर कपातीबाबत बैठक 


 अमेरिकेत तेल भंडार वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घसरण पाहायला मिळतेयं. या आठवड्यात ओपेक आणि गैर ओपेक प्रमुख कच्चे तेल उत्पाद देशांच्या किंमतीत झालेली घसरण पाहता संभाव्य दर कपातीबाबत अबु धाबीमध्ये बैठक होणार आहे.