नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत या दर वाढीवर फक्त सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला होता. पण आता सरकारमधून देखील पेट्रोल-डिझेल दर वाढीला विरोध होत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यानीं टॅक्समध्ये घट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी झाला पाहिजे - शक्तीकांता दास
RBI मॉनिटरी पॉलिसीच्या मिनट्समध्ये शक्तीकांता दास यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इनडायरेक्ट टॅक्समध्ये (Indirect taxes)कपात करण्यासाठी आवाहन केलं आहे. टॅक्समध्ये कपात केल्यानंतर इंधनांच्या दरात देखील घसरण होईल असं देखील ते म्हणाले. 


कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या इनडायरेक्ट टॅक्समुळे आवश्यक वस्तूंवरील दर वाढले आहेत. ज्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि आरोग्य सेवेचा देखील समावेश आहे. दरम्यान पेट्रोलचे दर वाढल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास देखील महागला आहे.


पेट्रोल-डिझेलचे वाढते दर
फेब्रवारी महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात 15 वेळा वाढ नोंदवण्यात आली आहे. याआधी जानेवारी महिन्यात 10 वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. यादरम्यान पेट्रोल 2.59 रूपयांनी तर डिझेल 2.61 रूपयांनी वाढले आहेत. 2021 पासून पेट्रोलचे दर सतत वाढतच आहेत. १ जानेवारी रोजी पेट्रोलचे  दर 83.71 रूपये होते, तर आत त्याच पेट्रोलसाठी 90.93 रूपये मोजावे लागत आहेत. 


चार मेट्रो शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 


शहर           डिझेलचे दर          पेट्रोलचे दर 
दिल्ली            81.32             90.93  
मुंबई             88.44             97.34   
कोलकाता          84.20             91.12 
चेन्नई            86.31              92.90