Petrol Diesel Price Today: अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच सोमवारी देशातील अनेक शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात आज इंधनच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चा तेलाच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळतेय. मात्र, देशातील चार महानगरांत कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी तेल कंपन्यांनुसार, उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त होऊन 94.66 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेल 18 पैशांनी कमी होऊन 87.76 रुपये लीटर झाले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 12 पैशांनी कमी होऊन 94.53 रुपये आणि डिझेल 14 पैशांनी कमी होऊन 87.61 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त होऊन 87.83 लीटरने विक्री केली जात आहे. 


कच्चा तेलांच्या किंमतीत गेल्या 24 तासांत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बेंट क्रूडचा भाव कमी होऊन 83.09 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. डब्लूटीआयचा दरदेखील 80.55 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. 


चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर


-दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 100.76 रुपये आणि डिझेल 92.35 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल १०४.९५ रुपये आणि डिझेल ९१.७६ रुपये प्रति लिटर


या शहरांत बदलले दर


- गाझियाबादमध्ये पेट्रोल 94.53 रुपये आणि डिझेल 87.61 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- नोएडामध्ये पेट्रोल 94.66 रुपये आणि डिझेल 87.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गुरुग्राममध्ये पेट्रोल 94.97 रुपये आणि डिझेल 87.83 रुपये प्रति लिटर झाले आहे.