मुंबई : पेट्रोल-डिझेलची वाढती किंमत दररोज नवीन विक्रम तोडत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर शंभरी पार आहे. त्यात काल म्हणजेच रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. इंधनाच्या वाढत्या दराचा फटका देशातील सामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी सरकार कच्च्या तेलाचे कारण देत आहे. भारत आपल्या खनिज तेलाच्या आणि कच्चा तेलाच्या आवश्यकतेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो.


कच्च्या तेलाचे दर का वाढत आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ कायम आहे. जगात कोरोना लसीकरणासाठी मोहीम सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचा दर वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे, देशांतर्गत तेल कंपन्या आधारभूत किंमत निश्चित करतात. यानंतर परिवहन शुल्क, कर, डीलर कमिशन हे सगळ त्यावर आकारले जाते. हेच कारण आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शहरांनुसार वेगवेगळ्या असतात.


आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे?


आज म्हणजेच सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहे. या वाढीनंतर, आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.41 रुपये आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.28 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 102.58 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 94.70 रुपये आहे.


तर कोलकातामध्ये आज पेट्रोल 96.34 रुपये, तर डिझेल 94.70 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 97.69 रुपये तर डिझेलची किंमत 91.92 रुपये आहे.


तुम्हाला जर दररोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घ्यायचे असल्यास ते कसे मिळवावे हे जाणून घ्या.


दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होत असतात, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत सकाळी 6 वाजता जाहीर केली जाते. त्यामुळे तुम्हाला जर याचे रोजचे भाव जाणून घ्यायचे असतील तर, तुम्ही घरी बसलेल्या SMSद्वारे जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल ग्राहक RSP समवेत सिटी कोड वापरुन त्यांच्या मोबाईलवरून 9224992249 वर मॅसेज पाठवावा.


इंडियन ऑयल (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला तुमच्या शहराचा कोड सापडेल. मॅसेज पाठवल्यानंतर, तुम्हालाला पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत पाठविली जाईल. त्याचप्रमाणे BPCL ग्राहक त्यांच्या मोबाईलवरून RSP टाइप करून 9223112222  वर SMS पाठवू शकतात. तर  HPCL ग्राहक  9222201122 वर HPPrice लिहून SMS पाठवू शकता.