Petrol Diesel Price 25 July 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत सातत्याने चढउतार होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाने पुन्हा एकदा 82 डॉलर प्रति बॅरल पार केले आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.08 डॉलरने वाढून प्रति बॅरल 78.82  डॉलरने विकले जात आहे. असे असतानाही आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) दिलासा आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 434 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल झाला होता. मात्र आता पुन्हा इंधनाच्या किमती स्थिरावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित दर जाहीर केले जातात. पोर्ट ब्लेअरमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल  84.10 आणि डिझेल  79.74 प्रति लिटर आहे. दुसरीकडे, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.48 आहे, तर डिझेलची किंमत 98.24 आहे.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर आहे. आज अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. बिहार, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे.


चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर


- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर


दरम्यान, ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट क्रूडची सप्टेंबरची फ्युचर्स किंमत प्रति बॅरल  82.77 डॉलर आहे. डब्ल्यूटीआयची सप्टेंबर फ्युचर्स किंमत आता प्रति बॅरल 78.86 डॉलर आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूडच्या किमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.