पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. ३६ दिवसानंतर पहिल्यांदाच इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. या ३६ दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव २२ वेळा आणि डिझेलचे भाव १८ वेळा कमी करण्यात आले. ३६ दिवसानंतर आता पेट्रोलची किंमत १७ पैशांनी आणि डिझेलची किंमत १३ पैशांनी कमी करण्यात आली. कच्च्या तेलाची वाढलेली किंमत आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयामुळे तेल कंपन्यांनी इंधन दरवाढीचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ८३.१० रुपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ७१.६२ रुपये प्रती लीटर आहेत.