मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेट क्रूडचे दर 60 डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचल्यावर घरगुती बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल जवळपास खालच्या दरात गेल्यानंतर आता दर दिवसेंदिवस वाढत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सहाव्या दिवशी देखील दिल्ली आणि इतर चार महानगरांमध्ये दरात वाढ पाहायला मिळाली. दिल्लीत अगोदरच दर 70 रुपयांवर पोहोचला असताना आता त्यामध्ये वाढ झाली असून 28 पैशांनी दर वाढला आहे. 


हे आहेत चार महानगरांमधील दर 


दिल्लीत मंगळवारी एक लीटर पेट्रोलचे दर 70.41 रुपयांपर्यंत पोहोचले. तर डिझेलमध्ये देखील 29 पैशांनी वाढ झाली असून 64.47 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यासोबतच कोलकाता, मुंबई आणि चैन्नईमध्ये पेट्रोलचे दर क्रमशः 72.52 रुपये, 76.05 रुपये आणि 73.08 रुपयांपर्यंत आहे. तर डिझेलमध्ये देखील 29 पैसे ते 31 पैशांपर्यंत वाढ झाली आहे. डिझेलची किंमत क्रमशः आहे 66.24 रुपये, 67.94 रुपये आणि 68.9 रुपये. 


50 डॉलरपर्यंत पोहोचले दर 


तज्ञांना माहिती आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुढील काही दिवस वाढ पाहायला मिळेल. 27 डिसेंबरपासून कच्चा तेलात वाढ पाहायला मिळत आहे. आता ब्रेंट क्रूड जवळपास 60 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. जर कच्च तेलं या स्तराच्या वरती जातं तक पेट्रोलच्या किंमतीत 1 ते 2 रुपयांनी वाढ होईल.