मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन दिवस अतिशय थंड गेले पण यानंतर सोमवारी हा नियम मोडला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. सौदी अरामकोच्या दोन प्लान्टवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर आशिया बाजारात मोठा फरक पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवारी सकाळी दिल्लीत पेट्रोल आणि डिेझेलच्या दरात अनुक्रमे 9-9 पैशांनी वाढ पाहायला मिळाली. 


दिल्लीत सोमवारी पेट्रोलची किंमत 74.42 रुपये प्रती लीटर होती. डिझेल देखील 9 पैशांनी वाढून 67.33 रुपये प्रती लीटर इतकं झालं. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 77.10 रुपये, 80.08 रुपये आणि 77.37 रुपये असा आहे. तर डिझेलचे दर 69.75 रुपये, 70.64 रुपये आणि 71.20 रुपये असा आहे. 


दिल्लीत गुरुवारी सकाळी पेट्रोल १५ पैसे प्रति लीटर दराने वाढुन ७४.३४ रुपये प्रती लीटर झाले आहे. तसेच डिझेल १० पैशांनी वाढून ६७.२४ रुपये लीटर झाले आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये ७७.०३ रुपये, ८० रुपये आणि ७७.२९ रुपये स्तरावर पोहोचले आहे. तर डिझेलच्या किंमतीही क्रमश: ६९.६६ रुपये, ७०.५५ रुपये आणि ७१.१० रुपये स्तरावर पोहोचले आहे.


गेल्या १० दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत २ रुपये प्रति लीटरने वाढ झाली. डिझेल देखील दिड रुपयांनी वाढले. शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूड ६१.२२ डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यटीआय क्रूड ५६.१६ डॉलर प्रति बॅरल स्तरावर पोहोचले.