Petrol-Diesel Price Today : गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीत किंवा कमीही केल्या नाहीत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.34 डॉलर इतके घसरले आहेत. तर कच्चे तेल प्रति बॅरल 73.52 डॉलरने विकले जात आहे. भारतातही 10 जुलैसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेल 70 पैशांनी महागले आहे. तर झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 44 पैशांची वाढ पाहायला मिळत आहे. याशिवाय राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यातही इंधनाचे दर किंचित प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे केरळमध्ये पेट्रोल 72 पैशांनी तर डिझेल 68 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी तर डिझेलच्या दरात 30 पैशांनी घट झाली आहे.


महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर


- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर


22 मे रोजी शेवटच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आणि तेव्हापासून आजतागायत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास ते वेबसाइटवर अपडेट केले जाते. येथून दररोज लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मिळते.


आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?


देशात इंधनाचे दर कमी होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे कारण हा युक्रेन युद्धानंतर भारताला रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर जी सूट किंवा सवलत मिळत होती ती आता बरीच कमी झाली आहे. दुसरीकडे, या तेलाच्या वाहतुकीसाठी रशियाने ज्या युनिट्सची व्यवस्था केली आहे, ते भारताकडून सामान्यपेक्षा कितीतरी जास्त दर आकारत आहेत. दुसरीकडे, रशिया भारतीय रिफायनरी कंपन्यांना पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या प्रति बॅरल 60 डॉलरच्या किंमतीपेक्षा कमी शुल्क आकारत आहे. पण कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी ते 11 डॉलर ते 19 डॉलर प्रति बॅरल खर्च येत आहे. हे बाल्टिक आणि काळ्या समुद्रातून पश्चिम किनार्‍यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामान्य शुल्कापेक्षा दुप्पट आहे.