Petrol Diesel Price on 2 August 2023: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती पुन्हा एकदा भडकायला लागल्या आहेत. दुसरीकडे देशातही सरकारी तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर करतात. ही किंमत राज्ये आणि शहरांनुसार बदलत असते. बुधवारीही वेगवेगळ्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी भावात वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी भावही कमी झाले आहेत. 2 ऑगस्ट रोजी ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.05 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे आणि ते प्रति बॅरल 85.80 डॉलर च्या आसपास विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किंमतीत 1.03 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे आणि ते प्रति बॅरल 82.21 डॉलरने विकले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर कपात केली होती. केंद्र सरकारने मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात कपात केल्यापासून, काही राज्यांनी इंधनावरील व्हॅटच्या किमतीही कमी केल्या आहेत, तर काहींनी पेट्रोल आणि डिझेलवर सेस लावला आहे. अशातच कच्च्या तेलाच्या दरात गेल्या 24 तासांत त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही परिणाम झाला आहे. आज अनेक शहरांमध्ये दर बदलले आहेत.


चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?


नवी दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर


मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


चेन्नई- पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर


कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 19 रुपयांनी वाढ 


पाकिस्तानात सरकारने जुलैच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 जुलै 2023 रोजी इंधन दरवाढ जाहीर केली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या सध्याच्या किमतीत 19.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात 19.90 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती 1 ऑगस्ट 2023 पासून लागू झाल्या आहेत.