Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नरमल्याने राष्ट्रीय बाजारात तेलाचे दर स्थिर आहेत. आज (21 ऑगस्ट ) भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर स्थिर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नेहमी चढ-उतार होत असतात. मात्र 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आजही एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 106.03 आणि डिझेलचे दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. 
  
शहरांची नावे   पेट्रोलचे दर (लीटर )  डीझेलचे दर (लीटर )
अजमेर           108.43    93.67 
श्रीगंगानगर      113.65    98.39
पटना             107.24  94.02 
नोएडा              96.57 89.96
चंडीगढ़           96.20  84.26
गुरुग्राम           97.18   90.25  


दर कुठे आणि कसे पाहाल?
IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).