मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढ झाली आहेत. त्यात आता राजस्थानच्या श्री गंगानगरमधील पेट्रोलची किंमत आता 108 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे, तर डिझेल 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. श्री गंगानगर हे देशातील पहिले असे शहर आहे जिथे डिझेलने शंभरी पार केली आहे. देशातील 7 राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पेट्रोल 22-25 पैसे प्रति लीटर महाग झाले आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 12-15 पैशांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति डॉलर 73 च्या जवळपास आहे. ज्यामुळे या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, तर त्यांच्या दरात केवळ 4 वेळ कपात झाली आहे.


या वर्षातील पेट्रोल आणि  डिझेलच्या दराबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 14% वाढ झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार होत्या त्याकाळातच या किंमती स्थिर राहिल्या. त्यावेळेस मार्चमध्ये 3वेळा आणि एप्रिलमध्ये एकदा यांच्या किंमती कपात झाल्या आहेत.


जूनमध्ये आतापर्यंत किंमती 9 वेळा वाढल्या


मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर डिझेल 95 रुपयांच्या जवळपास पोचले आहे. जूनमध्ये आतापर्यंत या किंमतीत 9 वेळा वाढ झाली आहे.


मेमध्ये 19 वेळा किंमती बदलल्या


यापूर्वी मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 16 वेळा वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 4 मेपासून सलग 4 दिवस वाढ करण्यात आली होती, तर निवडणुका असल्यामुळे सुरवातीचे 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरावले होते.


4 मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलची किंमत


शहर         कालची किंमत  आजची किंमत       
दिल्ली            96.41            96.66
मुंबई            102.58          102.82
कोलकाता      96.34            96.58
चेन्नई             97.69             97.91


4 मेट्रो शहरांमध्ये डिझेलची किंमत


शहर      कालची किंमत   आजची किंमत   
दिल्ली          87.28          87.41
मुंबई            94.70          94.84
कोलकाता     90.12         90.25
चेन्नई            91.92          92.04


पेट्रोलच्या किंमतीच्या 60 टक्के हिस्सा हा केंद्रीय उत्पादन शुल्क आणि राज्यच्या टॅक्समध्ये जातो, तर डिझेलमध्ये हा हिस्सा 54 टक्के आहे. पेट्रोलवर केंद्रीय उत्पादन शुल्क 32.90  रुपये प्रतिलिटर आहे, तर डिझेलवर  31.80  रुपये प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय क्रूड किंमती आणि फॉरेन एक्सचेंजच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.