मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलची किंमत १.२१ रुपयांनी तर डिझेलची किंमत १.२४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ जून म्हणजेच उद्यापासून देशभरात पेट्रोल आणि डेझेलचे दर रोज बदलणार आहेत. पाच शहरांमधल्या यशस्वी प्रयोगानंतर आता देशातल्या सर्व ५८ हजार पेट्रोल पंपांवर रोज इंधनाचे दर बदलणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातले दर आणि डॉलरच्या विनिमयाचा दर यानुसार हे दर ठरवण्यात येतील, असं सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या संघटनेनं जाहीर केलंय.


इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर असतील, तसंच प्रत्येक शहरातही वेगवेगळे दर असू शकतात, असं या कंपन्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत दर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेल दरांचा आढावा घेतला जात होता. पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.