Petrol Diesel Price 19 May in Maharashtra : देशभरातील सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. भारतीय पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel price) किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमती आणि इतर निकषांच्या आधारे निश्चित केल्या जातात. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. येथे पेट्रोल 11 पैशांनी आणि डिझेल 9 पैशांनी 102.74 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (19 मे 2023) संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोलची विक्री सरासरी 106.94 रुपये दराने होत आहे. काल (18 मे 2023) ही महाराष्ट्रातील किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती 0.06 टक्क्यांनी वाढून सरासरी 106.87 रुपये प्रति लिटरच्या दरावर बंद झाली. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. अनेक घटक किंमती निर्धारित करतात, जसे की रुपया ते यूएस डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणीसह किमत आधारित असते. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. 


 


शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.97  93.46
अकोला  106.24  92.79
अमरावती  106.90  93.42
औरंगाबाद  107.24  93.72
भंडारा  107.11  93.62
बीड  106.84  93.35
बुलढाणा  106.83  93.35
चंद्रपूर  106.13 92.69
धुळे  106.04  92.57
गडचिरोली  107.03 93.55
गोंदिया  107.64  94.13
बृहन्मुंबई  106.49 94.44
हिंगोली  107.19  93.70
जळगाव  106.25  92.77
जालना  107.84  94.29
कोल्हापूर  106.56 93.09
लातूर  107.40  93.89
मुंबई शहर  106.31  94.27
नागपूर  106.64  93.17
नांदेड  108.87  95.30 
नंदुरबार  107.22 93.71
नाशिक  106.18  92.69
उस्मानाबाद  106.86  93.37
पालघर  105.75  92.26
परभणी  109.33  95.73
पुणे  106.85  93.36
रायगड  106.81  93.27
रत्नागिरी  108.05  94.52
सांगली  106.21  92.75
सातारा  106.44  92.94
सिंधुदुर्ग  107.77  94.25
सोलापूर  106.38  92.89
ठाणे  106.45 94.41
वर्धा  106.91  93.42
वाशिम  106.65  93.18
यवतमाळ  107.35  93.85

तर दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.