Petrol Diesel Price Today on 6 March 2023 : पेट्रोलचे (petrol price) दर डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर होतात. आज होळीच्या (Holi 2023) पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे (petrol diesel price) दर जाहीर झाले असून आजही ( HOli 2023) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 


महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर दिसून येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलबदल बोलायला गेलो तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचा (petrol Diesel rate) भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेलचा भाव 94.27 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.  


वाचा: H3N2 मागोमाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; सध्याचे सक्रीय रुग्ण किती? 


शहर पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.) 
मुंबई 106.31  94.27 
दिल्ली 96.72  89.62
चेन्नई 102.63 94.24
कोलकाता     106.03     92.76
बेंगलुरु 101.94 87.89
लखनऊ 96.57  89.76
नोएडा 96.79 89.96
गुरुग्राम 97.18 90.05
चंडीगड 96.20 84.26
पटना 107.24     94.04 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.