Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घट पाहायला मिळते आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही होणार का? असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये घट झाल्याची पाहायला मिळते आहे. मुंबई मात्र दिल्लीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या जास्त असल्याचे समजते आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, मुंबईत पेट्रोलची किंमत ही 106.31 रूपये प्रति लिटर इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 94.27 रूपये प्रति लीटर इतकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये हेच दर अनुक्रमे 96.72 रूपये प्रति लीटर आणि 89.62 रूपये प्रति लीटर इतके आहेत. बंगलोरमध्ये पेट्रोलच्या किमती या 101.94 रूपये प्रति लीटर तर डिझेल 87.89 रूपये प्रति लीटर इतके आहे. चेन्नईला हेच दर 102.74 प्रति लीटर पेट्रोल आणि 94.33 रूपये प्रति लीटर डिझेल अशा किमती आहेत. कोलकाता येथे 106.03 रूपये प्रति लीटर पेट्रोल तर 92.76 रूपये प्रति लीटर डिझेल इतक्या किमती आहेत. 


पेट्रोल - डिझेल स्वस्त? 


कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या तर त्याचा प्रत्यक्षरीत्या परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये होणार. जसं कच्च्या तेलाच्या किमती या कमी होऊ लागतील त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्याही किमती कमी होऊ लागतील.सध्या हाच बदल पाहायला मिळतो आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, पेट्रोलच्या किमती या गेल्या 10 दिवसांपासून 106.31 रूपये प्रति लीटर तर डिझेल हे 94.27 रूपये प्रति लीटर इतके आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना कात्री तर लागली नाहीच सोबतच आता ग्राहकांना जास्तीचे पैसेही मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे डेटानुसार, या किमती जवळपास महिनाभर तरी कमी होत आल्या आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ लागल्याचे पाहायला मिळाले आहे. 


तुमच्या शहरातील दर काय? 


गुडरिटर्न्सनुसार, काल कोल्हापूरात पेट्रोलच्या किमतींमध्ये 1.39 रूपयांची वाढ झाली होती. आज 0.05 रूपयांनी पेट्रोलची किंमत घसरली आहे. आजच्या किमतीनुसार कोल्हापूरात पेट्रोल 107.40 रूपये प्रति लीटर इतके आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत ही 106.63 रूपये प्रति लीटर आहे. नाशिकमध्ये हीच किंमत 106.51 इतकी आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत ही 106.38 रूपये प्रति लीटर इतकी आहे तर ठाण्याला पेट्रोल 106.45 रूपये इतकी आहे.  औरंगाबाद येथे ही किंमत 106.52 रूपये एवढी आहे.