Petrol Diesel Price on 5th April 2023 : गेल्या काही दिवसापासून कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरावर दिसून येतो. तुम्ही जर आज गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर एका SMS वर पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) तपासून घ्या...कारण जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमती सतत वाढत आहेत आणि ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल $85 चा दरही ओलांडला आहे. दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे (Petrol Diesel Price) दर जाहीर केले. त्यात काही ठिकाणी वाढ तर कुठे कमी झाली आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 15 पैशांनी वाढून 96.92 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 14 पैशांनी वाढून 90.08 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 11 पैशांनी महाग झाले असून ते 96.68 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 11 पैशांनी वाढले आहे आणि 89.87 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.26 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. येथे डिझेल 30 पैशांनी 89.45 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.  


तर आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


  • दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 984.27 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.