Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. अमेरिकी क्रूड फ्युचर्स 1.8 टक्क्यांनी वाढून 93.55 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. त्याचवेळी ब्रेंट क्रूड फ्युचर्स 1.6 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 98.94 वर व्यवहार करत होते. तर दुसरीकडे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. देशात आजही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डीझेल 89.62 रूपये प्रति लिटरने दर स्थिर आहेत. 
  
देशातील प्रमुख शहरांमधील किंमती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दर आहे. तर, राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दर आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 107.98 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर असल्याची माहिती IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


- इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


- इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर पाहता येतील.


- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).