Petrol-Diesel Price Today 27th September : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून ती 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol diesel rate) दरात कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे क्रूड कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी वाढली आहे. (petrol diesel prices in maharashtra state on 27 september 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात!


येत्या काळात तेलाच्या किमती (Oil prices) कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर कमी झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना दरात दिलासा मिळाला आहे. किमतीतील हा बदल चार-तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र (maharashtra) आणि मेघालयमध्ये तेलाच्या दरात बदल झाला आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार (shinde government) आल्यानंतर व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले.


कच्च्या तेलाचे आजचे भाव


कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच आहे. मंगळवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूडची (WTI Crude) किंमत प्रति बॅरल $ 76.70 या नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 84.07 वर दिसले.


शहर   -  पेट्रोल (प्रति लिटर ) -  डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर - 107.17 - 93.66
अकोला - 106.17 - 92.72
अमरावती - 107.48 -  93.97
औरंगाबाद - 107.07 - 93.55
भंडारा - 107.01 - 93.53
बीड - 106.58 - 93.09
बुलढाणा - 107.83 - 94.29
चंद्रपूर - 106.97 - 93.48
धुळे - 106.53 - 93.48
गडचिरोली -  107.24 - 93.76
गोंदिया - 107.19 - 93.70
बृहन्मुंबई - 106.31 - 94.27
हिंगोली - 107.69 - 94.18
जळगाव - 106.89 - 93.38
जालना - 107.81 - 94.27
कोल्हापूर - 106.25 - 92.79
लातूर - 107.19 - 93.69
मुंबई शहर - 106.31 - 94.27
नागपूर -106.27 - 92.81
नांदेड - 107.69 - 94.18
नंदुरबार - 107.25 -  93.74
नाशिक -  106.18 - 92.69
उस्मानाबाद - 107.35 - 93.84
पालघर -106.06 - 92.55
परभणी - 109.47 -95.86
पुणे - 105.84 - 92.36
रायगड -105.86 -  92.36
रत्नागिरी - 107.24 -  93.68
सांगली - 106.05 - 92.60
सातारा -106.73 -  93.22
सिंधुदुर्ग - 108.01 - 94.48
सोलापूर - 106.49 - 93.01
ठाणे - 105.97 - 92.47
वर्धा - 106.29 - 92.83
वाशिम - 106.65 - 93.18
यवतमाळ - 107.78 - 94.27 


शहर आणि तेलाचे भाव आजचे दर


- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर