नवी दिल्ली : देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर ८० रुपयांच्या तर डिझेलचे दर ६७ रुपयांच्या वर गेले आहेत. २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे हे सर्वाधिक दर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पण या वाढीमुळे पेट्रोलियम मंत्रालय चिंतेत पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष आहे. हा रोष ओळखून पेट्रोलियम मंत्रालयानं अर्थमंत्री अरुण जेटलींकडे एक्साईज ड्यूटी कमी करण्याची मागणी केली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे येणाऱ्या बजेटमध्ये अरुण जेटलींनी इंधनावरची एक्साईज ड्यूडी कमी करावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयानं पाठवला आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर १९.४८ रुपये प्रती लिटर तर डिझेलवर १५.३३ रुपये प्रती लिटर एक्साईज ड्यूटी घेते. याखेरीज राज्य सरकार व्हॅटही लावते.