Today Petrol Diesel Price  : देशात दररोज पेट्रोल-डिझेलचे (petrol Diesel price) दर सकाळी 6 वाजता जाहीर होतात. पेट्र्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवले जातात. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परिणामी दिल्ली, मुंबई, (mumbai petrol rate) कोलकाता आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. राज्य सरकारनुसार इंधनाच्या किमतीवर व्हॅट लावतात, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. आज 26 फेब्रुवारी 2023 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत रु.96.72 आणि एक लिटर डिझेलची किंमत रु.89.62 वर स्थिर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.


वाचा: सेंट्रल, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा!  


NCR मध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे?


गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये एक लिटर पेट्रोल 97.18 रुपयांना तर डिझेल 90.05 रुपयांना विकले जात आहे. तर राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 108.48 रुपये तर डिझेलची किंमत 93.72 रुपये प्रति लिटर आहे. अजमेरमध्ये पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय अलवरमध्ये पेट्रोल १०९.७१ रुपये आणि डिझेल ९४.८१ रुपये दराने विकले जात आहे. तर जोधपूरमध्ये पेट्रोल 109.34 रुपये आणि डिझेल 94.51 रुपये प्रति लिटर आहे.


प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाणून घ्या


शहर पेट्रोल रुपये/लीटर डीजल रुपये/लीटर


दिल्ली 96.72 89.62 


मुंबई 106.31 94.27 


कोलकाता 106.03 92.76 


चेन्नई 102.63 94.24  


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.