मुंबई : देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात आता पेट्रोल आणि डिझेल देखील निश्चित मर्यादेत उपलब्ध होत आहे. कोरोनाव्हायरसमुळे तेलाच्या टँकरने मिझोरममध्ये जावू शकलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा (Petrol- Diesel) तुटवडा जाणवत आहे. यामुळे, आता स्थानिक लोकांना निर्धारित मर्यादेत इंधन द्यावे, असा मिझोराम राज्य सरकारने (Mizoram Government) निर्णय घेतला आहे.


 रेशनप्रमाणे मर्यादेत पेट्रोल आणि डिझेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिझोरम सरकारने वाहनांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण निश्चित केले आहे. आता राज्यात स्कूटरसाठी फक्त ३ लीटर, बाईकसाठी ५ लीटर आणि कारसाठी १० लिटरची मर्यादा निश्चित केली आहे.



आमची सहकारी zeebiz.com नुसार, केवळ २० लिटर डिझेल मॅक्सॅबॅब, पिक-अप ट्रक आणि मिनी ट्रकमध्ये भरता येऊ शकणार आहे. सिटी बस आणि इतर ट्रकची मर्यादा १०० लिटर निश्चित करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलही केवळ वाहनांसाठी मिळणार आहे. कॅन, बाटली किंवा इतर कोणत्याही सामग्रीत तेल भरण्यास संपूर्ण बंदी असेल.


मिझोरम (Mizoram)


मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूमुळे मिझोरम आणि आसपासच्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तेल टँकर येथे पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मोठी कमतरता आहे.