Petrol Price Today 9 november 2023: इस्रायल आणि हमास युद्धामुळं सुरुवातीला आंतरराष्ट्रीय  स्तरावर कच्चा तेल्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. 93 डॉलर प्रति बॅरलपर्यंत किमती पोहोचल्या होत्या. अद्यापही युद्ध थांबले नाहीये तरीदेखील कच्च्या तेलाच्या किंमती अचानक घसरल्या आहेत यामुळं अनेक देशांना दिलासा मिळू शकतो. कच्च्या तेलाच्या किंमतीत बुधवारी 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळं त्याचा परिणाम देशांतर्गंत बाजारपेठेवरही पडल्याचे पाहायला मिळू शकते. त्यामुळं भारतात यंदाच्या दिवाळीत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रूड ऑइलच्या किंमतीत जवळपास 5टक्के घसरण झाल्याने कच्च्या तेलाचा भाव 79.80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. तर, दुसरीकडे WTIची किंमतीतही घसरण होऊन 75.62 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या या घसरणीनंतर दर तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. मागणीत घट झाल्यामुळं किमती उतरल्या असल्याचे म्हटलं जात आहे. 


सणासुदीच्या दिवसांत मोदी सरकारकडून जनतेला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडेच रक्षाबंधनाच्या आधी देशात एलपीजी गॅसच्या किंमतीत 200 रुपयांनी कमी केले होते. पेट्रोल-डिझेलबाबत बोलायचे झाल्यास याआधीही सरकारने दिवाळीच्या आधी इंधनाच्या किंमती कमी करुन जनतेला दिवाळीची भेट दिली होती. 4 नोव्हेंबर 2021 रोजी सरकारने पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले होते. तर, 24 मे 2022 रोजी डिझेल-पेट्रोलच्या किंमतीत शेवटचा बदल करण्यात आला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत Petrol-Disel Price स्थिर आहेत. 


कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने सरकारी तेल कंपन्या आता पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करतील अशी शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीतून या कंपन्यांना होणारा तोटा वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आयात स्वस्त होऊन हा तोटा भरून निघण्यास मदत होईल. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचे संकेत आधीपासून सरकारकडून दिले जात आहेत.


मुंबईत पेट्रोलचा आजचा दर


मुंबई- पुण्यात पेट्रोलचा आजचा दर 106.31 रुपये प्रती लीटर असून डिझेल 94.27 रुपये प्रती लीटर इतका आहे. तर, नागपुरात पेट्रोलचा आजचा भाव 106.04 प्रती लीटर इतका आहे. व डिझेलचा 92.059 प्रती लीटर इतका आहे.