COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पेट्रोल डिझेलचे दर कडाडण्याची शक्यता आहे. प्रती लीटर ४ रूपये दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलची ही दरवाढ रोखण्यात आली होती. मात्र आता निवडणुका झाल्या असल्यानं, पुढील काही दिवसांत दर कडाडण्याची शक्यता आहे. कच्चं तेल तसंच डॉलरच्या दराचा फटका इंधन दरवाढीसाठी कारणीभूत ठरणार आहे. 


वाहनांशी संबंधित बातमी


वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं बेकायदेशीर नसल्याचा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयानं दिला आहे. जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळं लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणू शकत नाही, असं केरळ न्यायालयानं स्पष्ट केलंय. कोच्ची येथील संतोष एम.जे. या नागरिकानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निष्कर्ष काढलाय. वाहन चालवताना संतोष फोनवर बोलत असल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


मात्र मोटार वाहन अधिनियमात कुठंही मोबाईल फोनच्या वापराबद्दल उल्लेख केलेला नाही, याकडं न्यायालयानं लक्ष वेधलं. न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.