नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. आज देखील पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 91 रूपयांवर पोहोचले आहे. डिझेलचे भाव देखील वाढत आहेत. दिल्लीसोबतच मुंबईत देखील पेट्रोल 97 रूपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे काही दिवसात आता पेट्रोल १०० रूपयांचा आकडा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे प्रवासही माहागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगर परिसरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता तीन रुपयांनी महागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्य़ामुळे सर्वसामान्यांचा प्रवास देखील महागला आहे.


४ मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर 
शहर            कालचे दर            आजचे दर 
दिल्ली            90.58               90.93                                         
मुंबई             97.00               97.34   
कोलकाता         91.78                91.12 
चेन्नई            92.59                92.90


४ मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर 


शहर              कालचे दर           आजचे दर
दिल्ली            80.97                81.32
मुंबई             88.06                88.44        
कोलकाता         84.56                84.20
चेन्नई            85.98                86.31



आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. 



बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.