पेट्रोलचा उडाला भडका; मुंबईत शंभरी ओलांडली, पाहा प्रमुख शहातील दर
Petrol Price 11 June 2021 Update: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा भडकल्या आहेत.
मुंबई : Petrol Price 11 June 2021 Update: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा भडकल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे ( Mumbai Petrol ) दर प्रति लिटरच्या दर शंभरीच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडणार, याचे संकेत मिळत आहेत. मुंबई पेट्रोल 102 रुपये प्रति लीटर झाले आहे. देशात 135 जिल्ह्यांत पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत.
आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले
यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 4 वेळा कपात झाली आहे. केवळ या वर्षाबद्दल बोलायचे तर आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार होत्या तेव्हा किंमती स्थिर राहिल्या. त्याऐवजी मार्चमध्ये तीन वेळा आणि एप्रिलमध्ये एकदा दरात घट झाली होती. आज पेट्रोल 25-29 पैसे प्रति लीटर महाग झाले आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 27-30 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंवत प्रति बॅरल 72 डॉलरच्या वर गेली आहे. यामुळे किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये किंमतींमध्ये आतापर्यंत सहावेळा वाढ
मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 102 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर डिझेलची किंमत 94 रुपयांच्या पुढे गेली आहे. जूनमध्ये आतापर्यंत किंमतीत 6 वेळा वाढ झाली आहे. जूनमध्ये पेट्रोल 1.66 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 1.60 रुपयांनी महाग झाले आहे.
मे महिन्यात पेट्रोल 4.09 रुपयांनी महागले. याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मे महिन्यात 16 वेळा वाढविण्यात आल्या. तर मार्च, एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले. सर्वसामान्यांना 15 एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून थोडा दिलासा मिळाला. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीनदा कमी करण्यात आल्या. 15 एप्रिल 2015 पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल होता. तर दिल्लीत पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले. मार्चमध्ये पेट्रोल 61 पैशांनी तर डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले. मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन वेळा कपात करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाची कमजोरी.
मुंबईत पेट्रोल 102 रुपयांच्या पुढे गेले!
दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.85 रुपये आहे, मुंबईत आज पेट्रोल 102.04 रुपये आहे, कोलकातामध्ये पेट्रोल 95.80 रुपये आहे. आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 97.19 रुपयांना विकले जात आहे.
4 मेट्रो शहरांत Petrol ची किंमत
शहर कलचा दर आजचा दर
दिल्ली 95.56 95.85
मुंबई 101.76 102.04
कोलकाता 95.52 95.80
चेन्नई 96.94 97.19