PF ACCOUNT GOT HACKED: प्रत्येक पगारदारासाठी 'पीएफ'(PF) किती महत्वाचा असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही.कारण काहीजण पीएफमध्ये पैसे वाचवून रिटायरमेंट नंतर उरलेलं आयुष्य नियोजित करतात.पीएफ (PF)हा केवळ नोकरदार वर्गासाठी असतो. तुम्ही सरकारी नोकरीत असा किंवा खासगी नोकरीत असा. तुमच्या मासिक पगारातील ठराविक रक्कम आपल्या ईपीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफचे खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता हाच पीएफ तुम्हाला चिंतेत टाकणार आहे कारण देखील तसचं आहे.कारण पीएफ साईट हॅक झालीये आणि जवळपास २८ करोड खातेधारकांची माहिती लीक झालीये अगदी UAN नंबर पासून ते खात्यातील सर्व महत्वाची माहिती हॅक झालीये ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला हॅकिंग झाल्याचं माहितीनुसार समोर आलयं
 
या डेटा लीकमध्ये UAN नंबर, नाव, वैवाहिक स्थिती, आधार कार्डचा संपूर्ण तपशील, लिंग आणि बँक खात्याचा संपूर्ण तपशील समाविष्ट आहे. माहितीनुसार हा डेटा दोन वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसवरून लीक झाला आहे. हे दोन्ही आयपी मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउडशी जोडलेले होते


इंडियन  कम्प्युटर  इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ला या डेटा लीकबद्दल माहिती देण्यात आली आहे  त्यांनतर CERT-IN ने संशोधकाला ई-मेलद्वारे अपडेट  करण्यात आलं आहे . CERT-IN ने म्हटले आहे की दोन्ही IP ऍड्रेस  12 तासांच्या आत ब्लॉककरण्यात आले आहेत आणि अजूनपर्यंत  कोणत्याही एजन्सीने किंवा हॅकरने या हॅकिंगची जबाबदारी घेतलेली नाही.


हॅकर्स ,28 कोटी युजर्सच्या  डेटाचा चुकीच्या पद्धतीने वापरही करू शकतात. लीक झालेल्या माहितीच्या आधारे लोकांचे फेक प्रोफाईल तयार केले जाऊ शकतात.पहिल्या IP मधून 280,472,941 डेटा लीक झाल्याची आणि दुसऱ्या IP मधून 8,390,524 डेटा लीक झाल्याची नोंद आहे. हॅकरची अद्याप ओळख पटलेली नाही. इंडियन  कम्प्युटर  इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम  यावर काम करत आहे .