तुमच्या PF खात्यावर 1 एप्रिलपासून लागणार टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती
PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे.
मुंबई : PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटच्या करमुक्त योगदानावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेल्या कॅप अंतर्गत विभाजित केले जातील. यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी (VPF) यांच्या कर आकारणी प्रक्रियेवर परिणाम होणार आहे.
नवीन आयकर नियमांनुसार, गैर-सरकारी कर्मचार्यांसाठी करमुक्त योगदानावर 2.5 लाख रुपये आणि सरकारी कर्मचार्यांसाठी 5 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
यामुळे जेव्हा एखादा गैर-सरकारी कर्मचारी त्याच्या/तिच्या पीएफ खात्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करेल, तेव्हा त्यावर मिळणाऱ्या इंट्रेस्टवर व्याज लावले जाईल.
तसेच एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास त्याच्या जादा रकमेतून मिळणारे व्याज हे कराच्या अधीन असेल.
हा नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होईल ज्या अंतर्गत ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त योगदानातून मिळणारे उत्पन्न करपात्र असेल. 31 मार्च 2021 पर्यंत कर्मचार्यांनी केलेले सर्व योगदान करपात्र नसलेले योगदान मानले जाईल.
हे लक्षात घेतले पाहिजे की, जादा रकमेवरील व्याज नॉन-करपात्र योगदान आणि करपात्र योगदानांसाठी स्वतंत्रपणे मोजले जाईल.
करमुक्त योगदानासाठी नवीन नियम करदात्यांना त्यांच्या करांची गणना करण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करेल असे म्हटले जाते. हे करपात्र आणि गैर-करपात्र योगदानाचे विभाजन करण्यात देखील मदत करेल.