पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले अपघातग्रस्त F-16चे अवशेष
भारतीयवायुदलाने निशाणा साधला
श्रीनगर : भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन २६ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्ममदचे तळ उध्वस्त केले. ज्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या वायुदलाती काही विमानं भारतीय हवाई सीमा ओलांडून आली आणि त्यांनी युद्धासाठी आपण सज्ज असल्याचा इशारा दिला. भारतीय सीमेतून परत जाताना पाकिस्तानच्या एफ-१६ या विमानावर भारतीयवायुदलाने निशाणा साधला. ज्याच्या अवशेषांची काही छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
भारताच्या दोन लढाऊ विमानांना निशाणा केल्याचं सांगणाऱ्या पाकिस्तानच्याच लढाऊ विमानांचे अवशेष समोर आल्यामुळे आता पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंमधील अवशेष हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाय या अवशेषांची आणि त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आलेले काही सैन्यदल अधिकारीही फोटोत दिसत आहेत. हे अधिकारी पाकिस्तान सैन्यदलातील ७ नॉर्थर्न लाईट इन्फेंट्रीचे असल्याचं कळत आहे.
सध्याच्या घडीला विमानाचे हे अवशेष पाकिस्तानमध्ये भारतीय लढाऊ विमान मिग-२१ चे असल्याचं म्हणत व्हायरल होत आहेत. पण, सैन्यदल आणि वायुदलाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळवाट काढण्यास अपयशी ठरलेल्या पाकिस्तानी एफ-१६चेच हे अवशेष आहेत. एफ- १६ च्या इंजिनचे फोटो पाहता हे अवशेष त्याचाच एक भाग असल्याचं प्रतित होत आहे. बुधवारी सकाळी पाकिस्तानकडून भारतीय हवाई हद्द ओलांडण्याडण्यात आली होती. त्यांनी भारताची सीमा ओलांडताच भारतीय वायुदलानेही पाकिस्तानचं एक विमान पाडत त्यांना परतवून लावलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाकडूनच पाकिस्तानचं विमान पाडल्याची माहिती देण्यात आली होती.