जयपूर : जयपूरमध्ये काही काळ थांबलेल्या एका विमानात चक्क एक कबुतर आलं आणि क्रुमेंबर्ससह साऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. गो एअरच्या विमानात हे कबुतर शिरलं होतं. या कबुतरामुळे विमान उड्डाणाला तब्बल ३० मिनिटांचा विलंब झाला. हे विमान अहमदाबाद हून आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गो एअरच्या जी८-७०२ या विमानात उड्डाणापूर्वी कबुतर आला. कबुतर विमानात उडू लागल्याने प्रवाशांची ही तारांबळ उडाली. त्यानंतर विमानातून कबुतर बाहेर काढण्यात आले.  अनेकांनी मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ शूट केला. यामुळे विमान निघायला २० तास उशीर झाला.


प्रवासी विमानात आल्यानंतर दरवाजा बंद करण्यात आला. पण अचानक कबुतर विमानात दिसल्याने कर्मचारीही हैराण झाले. विमानात कबुतर आला कसा असा प्रश्न सगळ्यांना पडला. मोठ्या कसरतीनंतर कबुतराला बाहेर काढण्यात आलं. विमानाने हवेत झेप घेण्याआधी ही गोष्ट समोर आल्याने इतर अनर्थ टळला.