श्वान हा अतिशय निष्ठावंत पाळीव प्राणी म्हणून ओळखला जातो. याचं अतिशय ताजं उदाहरण समोर आलं आहे. एका पिटबुलने घराच्या गार्डन परिसरात आलेल्या कोब्राला चक्क आपटून आपटून मारलं आहे. या गार्डनमध्ये घरातील मुलं खेळत होते. श्वानाच्या या प्रसंगावधानाने मुलांचा जीव वाचला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये स्पष्ट दिसतंय की, कशाप्रकारे पिटबुलने आपल्या गळ्यातील रश्शी तोडून सापावर हल्ला केला आहे. आपल्या मजबूत दातांच्या मदतीने त्याने कोब्राला जमिनीवर आपटून आपटून मारलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना झांसी जनपदमधील रक्सा ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिव गणेश कॉलनीमधील आहे. पूर्व ब्लॉक प्रमुख पंजाब सिंह आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांच्याकडे पिटबुलसह इतर श्वान देखील आहेत. ही घटना घडली तेव्हा ते घरी नव्हते. पण त्यांचा मुलगा, नोकर आणि लहान मुले घरीच होती. 



संध्याकाळच्यावेळी कोब्रा घरात घुसला जेथे मुलं खेळत होते. हा कोब्रा मुलांच्या दिशेने जाऊ लागला. या दरम्यान मुलांची कोब्राकडे नजर गेली आणि ते आरडा-ओरडा करु लागले. पण दुसऱ्या टोकाला असलेल्या पिटबुलने आपल्या गळ्यातील रश्शी तोडली आणि तेथे पोहोचला. त्याने आपल्या धारदार दातांच्या मदतीने कोब्राला आपटून आपटून मारले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. 


पंजाब सिंह आपल्या पिटबुलचे अतिशय ऋणी आहेत. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पिटबुलने आतापर्यंत सुमारे 8 ते 10 सापांपासून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचवले आहेत. ते म्हणतात की पिटबुलसारखा बुद्धिमान प्राणी नाही.