मुंबई:  पावसाळा सुरु झाला कि वेध लागतात भटकंतीचे ,ट्रेक ला जाण्याचे.पावसात निसर्ग न्हाऊन निघतो आणि वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं.अशावेळी बाहेर जाऊन या वातावरणाचा आस्वाद  घेण्याचा मोह आवरता येत नाही पावसात भिजत ट्रेक ला जाणं हे तर आता सर्रास होतं मात्र तुमच्याकडे वेळ आहे आणि कुठे लांब ठिकाणी जाण्याचा  प्लॅन करत असाल तर भारतात काही अशी खास ठिकाणं आहेत जिथं तुम्ही आवर्जुन जा. कारण पावसात या ठिकाणी निसर्ग सौन्दर्य आणखी फुलून येतं आणि तुमची ट्रिप सत्कारणी लागेल यात शंकाच नाही.


तर पाहुयात या मान्सून ट्रिपसाठी ही काही खास ठिकाणं 
  
केरळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केरळला देवभुमी म्हटलं जातं ते तिथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून कोची असो वा वायनाड, मुन्नार किंवा कुमारकोम, कोणत्याही ठिकाणी जा तिथलं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला वेड लावेल.पावसाळ्यात कोची शहरापासून अवघ्या 73 किमी अंतरावर  अथिरापल्ली धबधब्या आहे तिथे जाणं माञ चुकवू नका.



दार्जिलिंग


पावसाळ्यात सुट्टीसाठी दार्जिलिंगला जाण्याची कल्पना देखील उत्तम आहे. जपानी मंदिर, चहाची बाग, रॉक गार्डन येथे भेट देऊ शकता. निसर्गासोबत फोटोग्राफीचा आनंदही घेता येतो.



मेघालय 


मेघालय हे पावसासाठी जगप्रसिद्ध आहे. मेघालयात सर्वाधिक पाऊस पडतो, असं म्हटलं जातं.  मेघालयमध्ये अनेक छोटे-मोठे धबधबे आहेत, जे पाहण्याची खरी मजा पावसाळ्यातच येते. याशिवाय तुम्ही आशियातील सर्वात स्वच्छ गावही येथे येऊन पाहू शकता.



 कोडाईकनाल 


तमिळनाडूमधील कोडाईकनाल हे देखील पावसाळ्यात फिरण्यासाठी खूप चांगलं ठिकाण आहे.  पावसाळ्यात इथं येऊन, तुम्ही ट्रेकिंग, बोटिंग करु शकता. डेव्हिल्स किचन, कोकर वॉक, कोडाई लेक आणि पिलर रॉक हे पाहण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.


जर तुम्हाला लांब न जात मुंबईच्या जवळपास कुठे जायचं असेल अगदी छोट्याश्या रोड ट्रिपसाठी तर पावसाळ्यात पुणे आणि मुंबईच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत जी पावसाळ्यात भेट देण्यास उत्तम आहेत.  विशेषतः रोड ट्रिपसाठी.   जिथे तुम्हला मनमुराद निसर्ग सौन्दर्याचा अनुभव घेता येईल