मुंबई : कोविड -19च्या (Covid-19) उपचारासाठीच्या मार्गदर्शकतत्त्वे सरकारने सोमवारी बदलली आहेत. कोरोनाच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांमधून रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर काढून टाकण्यात आला आहे. कोविड रुग्णांच्या उपचारामध्ये, गंभीर आजार दूर करण्यात आणि मृत्यूची घटना कमी करण्यात प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरली नाही, हे अभ्यास केल्यावर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यापुढे प्लाझ्मा थेरपी उपयोग करु नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लाझ्मा थेरपीचा लाभ नाही


कोविड-19साठी  (Coronavirus)स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्स-आयसीएमआरच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत, सर्व सदस्यांनी कोरोनावरील उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यास सहमती दर्शविली, त्यानंतर सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. कोविड-19 रुग्णांच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी प्रभावी असल्याचे आढळलेले नाही.


वैद्यकीय तज्ज्ञांनी सुरुवातीला दिला होता इशारा


इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या  (आयसीएमआर) अधिकाऱ्याने सांगितले की, टास्क फोर्सने कोविड-19 रुग्णांसाठी कोरोना उपचार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करुन प्लाझ्मा थेरपी काढून टाकली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही वैद्यकीय तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ, प्रधान वैज्ञानिक सल्लागार के.के. विजयराघवन यांनी देशातील कोविड-19 उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग तर्कनिष्ठ आणि अवैज्ञानिक उपयोग म्हणून केला. प्लाझ्माचा प्रयोग करुनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. ज्यात प्लाझ्मा थेरपीनंतरही कोरोना रुग्ण वाचू शकले नाहीत.


24 तासांत 3 लाखांपेक्षा कमी प्रकरणे दाखल झाली


सोमवारी भारतात कोविड-19 चे 2,81,386नवीन घटना समोर आल्या आहेत. यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 2,49,65,463 झाली. गेल्या 27 दिवसांत एका दिवसात घडलेली ही सर्वात कमी नवीन प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत, 4,106 लोक संसर्गामुळे मरण पावले. यासह मृतांचा आकडा वाढून तो 2,74,390 झाला आहे.


कोरोनाहून 84.51 टक्के लोक बरे  


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गावर 35,16,997 लोक उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांच्या 14.09 टक्के आहे. आकडेवारीनुसार, देशातील संसर्गातून एकूण  2,11,74,076 लोक बरे झाले आहेत आणि रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर  84.81 टक्के आहे. त्याचवेळी, कोविड-19मधील मृत्यूचे प्रमाण 1.10 टक्के आहे.