हल्दवानी : भात....भारतीयांचं एक प्रमुख खाद्य. मात्र हा भातच आता धोकादायक ठरु लागला आहे. त्यामुळे तुम्हीही तांदुळ खरेदी करताना सावधानता बाळगा. उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्दवानीचे दंडाधिकारी के के मिश्रा यांनी घरातले तांदुळ संपले होते म्हणून त्यांनी बाजारातून तांदूळ आणला. मात्र हा तांदूळ शिजवत असताना, त्याला वेगळाच वास येऊ लागला. खातानाही तो काहिसा स्पंजसारखा वेगळाच वाटत होता. त्याची शहानिशा केली असता, हा प्लास्टिक तांदूळ असल्याचं त्यांना आढळून आलं.


या तांदळाचा चेंडू करुन तो आपटला तरीही तुटत नव्हता. हा प्रकार गंभीर असून, आरोग्यासाठीही तो धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. जिल्हा प्रशासनानं या प्रकाराची दखल घेत, योग्य त्या कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे प्लास्टिकचा तांदूळ आता भारतात पाय पसरवू लागत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लोकांनीच वेळीच सावध होण्याची गरज आहे.