मुंबई : दूरच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वे प्रवासाला (Indian Railways) पसंती दिले जाते. कारण रेल्वे प्रवास खिशाला परवडणारा आणि सुरक्षित असतो. रेल्वे प्रवासासाठी थेट तिकीट खिडकीवरुन किंवा ऑनलाईन तिकीट काढता येते. पण जेव्हा ऐनवेळेस प्रवास करावा लागतो, तेव्हा तत्काल तिकीट काढावी लागते. मात्र तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटावरही (Platform Ticket Rules) प्रवास करु शकता. प्लॅटफॉर्म तिकीटाचे नक्की नियम काय सांगतात, हे आपण जाणून घेणार आहोत. (Platform tickets can travel by train, know the rules of indian railway) 
 
प्लॅटफॉर्म तिकीटावर रेल्वे प्रवास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्याकडे रेल्वेचं कन्फर्म तिकीट नसेल, तरीही तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटाच्या आधारे रेल्वे प्रवास करु शकता. त्यानंतर तुम्हाला तिकीट चेकरकडून तिकीट घेऊ शकता. हा नियम  (Platform Ticket Rules) रेल्वेचाच आहे. 


जाणून घ्या नियम


टीसी अनेकदा सीट रिक्त असूनही जागा देण्यास नकार देण्यास नकार देतात. पण टीसीला प्रवाशाला प्रवास करण्यापासून रोखता येत नाही. तिकीट नसल्यास टीसी तुमच्याकडून एकूण तिकीट रक्कम आणि दंड म्हणून 250 रुपये आकारेल.  


प्लेटफॉर्म तिकीट 


प्लेटफॉर्म तिकीटमुळे (Benefits of Platform Ticket) तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकात अधिकृत प्रवेश करु शकता. तुम्हाला संबंधित स्थानकावरुन प्लेटफॉर्म तिकीट खरेदी करता येते. या प्लेटफॉर्म तिकीटाची 1 तास इतकी मर्यादा असते. 


राखीव सीटबद्दल नियम काय सांगतो?


अनेकदा गडबडीमुळे किंवा अन्य कारणांमुळे रेल्वे सुटते. अशा वेळेस टीसी  तुमची राखीव जागा पुढील 2 स्थानकांपर्यंत कोणालाही देऊ शकत नाही. मात्र त्यानंतर टीसी ती राखीव जागा इतर प्रवाशांना देऊ शकतो.  


तिकीट हरवल्यास काय करायचं?


अनेकदा प्रवासादरम्यान तिकीट आपल्याकडून हरवते. अशा वेळेस प्रवासाला अधिकचे 50 रुपये देऊन टीसीकडून तिकीट प्राप्त करता येते.  


संबंधित बातम्या : 


मराठा आरक्षण : संभाजीराजे यांच्या आंदोलनावर अजित पवार यांचे महत्वाचे वक्तव्य


लग्नात वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा तांडव, गाड्यांचा चुराडा तर नवरदेवनं जीव वाचवत ठोकली धूम