कर्मचाऱ्यांना 72,500 रुपये परफॉमन्स रिवॉर्ड देणार; मोठा नफा झाल्याने या कंपनीचा निर्णय
सणासुदीच्या दिवसांआधी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी कोल इंडिया लि. ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी आपले सर्व गैर कार्यकारी कॅडर वर्क फोर्ससाठी 72 हजार 500 रुपयांचे परफॉमन्स रिवॉर्ड (Performance - linked - reward) देण्याचा निर्णय घेतला आहे
नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांआधी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी कोल इंडिया लि. ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी आपले सर्व गैर कार्यकारी कॅडर वर्क फोर्ससाठी 72 हजार 500 रुपयांचे परफॉमन्स रिवॉर्ड (Performance - linked - reward) देण्याचा निर्णय घेतला आहे. महारत्न कंपनीने म्हटले आहे की, PLR 11 ऑक्टोबरपर्यंत किंवा त्या आधी देण्यात येईल.
सर्व कर्मचाऱ्यांसाठी 72500 रुपयांचा रिवॉर्ड
कंपनीने म्हटले आहे की, कोल इंडिया आणि त्यांच्या सब्सिडिअरी सिंगरेनी कोलिअरीज कंपनी च्या गैर कार्यकारी कॅडर कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 72500 रुपयांचे पीएलआर देण्यात येईल. सेंट्रल ट्रेड युनियनच्या प्रतिनिधी तसेच कोल इंडिया आणि एससीसीएलमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जून तिमाहीमध्ये कंपनीला झाले बंपर प्रॉफिट
जून तिमाहीमध्ये कंपनीला चांगला फायदा झाला. कोल इंडियाचा प्रॉफिट चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये 52.4 टक्क्यांनी वाढून 3 हजार 169 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
कोळसा उत्पादनात 80 टक्के हिस्सेदारी
कंपनीचे कच्च्या कोळशाचे उत्पादन एका वर्षापूर्वी 12.08 कोटी टन होते. ते वाढून 16.04 कोटी टनांवर पोहचले आहे. म्हणजेच देशातील कोळशाचे उत्पादनात कोल इंडियाची हिस्सेदारी 80 टक्क्यांहून अधिक आहे.
कोल इंडियाने 2023 - 24 पर्यंत एक अब्ज टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी कोळशाच्या खदानींचा शोध, प्रक्रिया इत्यादींसाठी 1.22 लाख कोटींच्या गुंतवणूकीची योजना तयार केली आहे.