मुंबई : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लवकरच पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता जारी करण्याची तयारी पूर्ण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपूर्वी हप्ता मिळणे अपेक्षित आहे. तुम्हीही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्ही नवीन यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकता. 


डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना भेट


विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी त्यांच्या बँक खात्यात थेट 6000 रुपये पाठवते. आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेच्या 9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. आता पुढच्या म्हणजे दहाव्या हप्त्याचे पैसे येणार आहेत.


तुमच्या हफ्त्याचे स्टेटस पाहा


जर तुम्ही 'पीएम किसान' योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुम्ही या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता. येथे दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून, आपण यादीमध्ये आपले नाव सहजपणे तपासू शकता.


याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा


1. यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. आता त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर तुम्ही 'Get Report' वर क्लिक करा.
6. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.