मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेचा हफ्ता जारी केला आहे. परंतू जर कोण्या शेतकऱ्याच्या खात्यात हफ्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर, केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करता येते. जाणून घ्या तक्रार कशी करावी ते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी रोजी पीएम किसान योजनेचा १० वा हफ्ता जारी केला होता. जवळपास सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे त्याआधीच्या हफ्त्याचे पैसे अडकले होते. ते मिळून 4000 रुपये खात्यात जमा झाले आहेत. तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नसल्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबत तक्रार करता येते.


कशी करावी तक्रार?


जर तुमच्या खात्यात योजनेचे 2000 रुपये आले नसतील. तर, सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी  अधिकाऱ्यांशी संपर्क करा. त्यासोबत या योजनेशी संबधीत हेल्पलाईनवर फोन करू शकता. हा हेल्पलाईन डेस्क (011-23381092) सोमवार ते शुक्रवारपर्यंत खुला असतो. याशिवाय तुम्ही ईमेल (pmkisan-ict@gov.in) करून देखील तक्रार नोंदवू शकता. 


कृषी मंत्रालयाकडे करा तक्रार


कृषी मंत्रालयानुसार, जर कोणत्याही शेतकऱ्याच्या बँक अकाऊंटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले नसतील. त्याबाबतच्य तांत्रिक त्रुटी दूर करून ते पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. 


या योजनेबाबत स्टेटस तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि अप्लाय देखील करू शकता. योजनेच्या वेलफेअर सेक्शनमध्ये संपर्क करून तक्रार करता येते. त्यासाठीचा संपर्क क्रमांक 011-23381092  आहे. तर मेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.



मंत्रालयाला संपर्क करूनही तक्रार नोंदवता येते


पीएम किसान टोल फ्री नंबर : 18001155266, 155261, 011-24300606, 
पीए किसान लॅंडलाईन नंबर : 011—23381092, 23382401