PM Kisan | योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार; हे शेतकरी ठरतील अपात्र
PM Kisan Samman Nidhi Social Audit | पीएम किसान सन्मान निधीच्या अपात्र लाभार्थ्यांची माहिती सोशल ऑडिट करून घेतली जाईल. यानंतर सरकारकडून या लोकांची नावे यादीतून काढून टाकली जातील.
मुंबई : PM Kisan Samman Nidhi Social Audit : पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 12.50 कोटी लाभार्थी 11व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 11 वा हप्ता कधी येणार याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एप्रिल ते जुलै दरम्यान 11 वा हप्ता येणे अपेक्षित आहे.
सर्व लोकांची पडताळणी
पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित नवीन माहिती समोर येत आहे. अनेक अपात्र लोकही किसान सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाईल.
सोशल ऑडिट
यासाठी 1 मे ते 30 जून दरम्यान सोशल ऑडिट करण्यात येत आहे. या ऑडिटमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र व अपात्र लोकांची माहिती संकलित केली जाणार आहे. याबाबतचा आदेश कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी जारी केला आहे.
अपात्रांची नावे कमी होतील
अपात्रांची नावे यादीतून काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील. मृत व्यक्ती, एकाच कुटुंबातून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची नावेही लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत.
सोशल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.