12 कोटी लोकांसाठी Good News! ऑगस्टमध्ये जमा होणार `इतकी` रक्कम, जाणून घ्या
केंद्र सरकारकडून सुमारे 12 कोटी लोकांसाठी गुडन्यूज मिळणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारकडून सुमारे 12 कोटी लोकांसाठी गुडन्यूज मिळणार आहे. ऑगस्ट 2021मध्ये देशातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या खात्यात 2000 रुपयांचा 9 वा हप्ता ( 9th Installment) सरकार जमा करणार आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana 9th Installment for 12 crore Farmers)
सध्याचा काळ कोरोनाचा आहे. या कोरोना संकट काळात लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती चिंतेत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अद्याप धोका संपलेला नाही. अशा परिस्थितीत आता पंतप्रधान मोदी सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या खात्यात 2000 रुपयांचा 9 वा हप्ता सरकार जमा करणार आहे.
PM Kisan Samman Nidhi योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या ( Farmers) बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जात आहे. सहा हजार रूपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये अशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा (Direct Benefit Transfer) केली जात आहे. सर्व पात्र शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळावा याची काळजी घ्यावी, असे केंद्र सरकारने राज्यांना बजावले आहे.
या योजनेमागे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 8 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता हा नववा हप्ता असणार आहे. सुमारे 12 कोटी नोंदणीकृत शेतकर्यांना या हप्त्याचा लाभ देखील मिळेल. (12 crore Farmers) यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्याला पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. दरम्यान, नोंदणीमध्ये काही चूक असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in लॉगीन करावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादीवर (Beneficiary list) क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.