PM Kisan Yojna : देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 12 वा हप्ता मिळाल्यानंतर आता 13 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे.  केंद्र सरकारची पीएम किसान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या या योजनेतील 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.


तेराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम किसानचा पुढील म्हणजेच 13 वा हप्ता (PM Kisan yojana 13th installment) लवकरच येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवले जातात. आता पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.


1. हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा.
2. आता Farmers Corner वर क्लिक करा.
3. आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.