नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बाबतीत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातच नाही तर जगभरातही चर्चा सुरु झाल्या आहेत. लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर आज चर्चा झाली. या दरम्यान लद्दाखचे भाजपचे खासदार जामयांग शेरिंग यांनी जोरदार भाषण केलं. लद्दाखला केंद्र शासित प्रदेश बनवल्यामुळे त्यांनी आभार मानले. जामयांग शेरिंग यांचं भाषण ऐकून गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामयांग शेरिंग यांनी म्हटलं की, आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकी सुधारण्यात आली आहे. 70 वर्ष काँग्रेस-पीडीपी-नॅशनल कॉन्फ्रेंसने लद्दाखला आपलं मानलं नाही. आणि आज लद्दाख बद्दल बोलत आहेत. या लोकांना लद्दाख बद्दल काहीच माहित नाही. पुस्तकं वाचून हे लोकं बोलत आहेत.


त्यांनी पुढे म्हटलं की, 'सुरुवातीपासूनच आम्हाला देशाचा अभिन्न भाग बनायचं होतं. आम्ही तेव्हा देखील म्हटलं होतं की, लद्दाखला काश्मीर सोबत ठेवू नका. शेरिंग यांनी म्हटलं की, अनुच्छेद 370 मुळे आमचा विकास झाला नाही. यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे.'


'1965-71-99 च्या लढाईत नेहमी लद्दाखच्या लोकांनी बलिदान दिलं. नॅशनल कॉन्फ्रेंसचे खासदार म्हणत होते की, अनुच्छेद 370 हटवल्यामुळे आम्ही खूप काही गमावणार आहोत. पण मी त्यांची या गोष्टीशी सहमत आहे. कारण ते या गोष्टीमुळे एक गोष्ट गमवतील. ती म्हणजे २ कुटुंबाचे रोजी-रोटी. जे आतापर्यंत काश्मीरवर राज्य करत होते.'


कलम 144 लागू केल्यामुळे कारगिल बंद नाही आहे. आमच्याकडे तर लोकं आनंद व्यक्त करत आहेत. काही लोकं एकाच रस्त्याला कारगिल समजतात. काश्मीर कोणाच्या बापाचा नाही.'



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत खासदार जामयांग शेरिंग यांच्या भाषणाचं कोतुक केलं.