महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर आता या फोटोमुळे काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रमाणे भूकंप झाला आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे आता इतर राज्यात देखील विरोधकांचं टेन्शन वाढलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली खुर्ची तर गमावलीच पण बंडखोरीमुळे पक्षाला ही मोठं खिंडार पडलं. पण आता सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल हा फोटो झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. पीएम मोदी आज देवघर दौऱ्यावर होते. निवडणुकीतील विजय-पराजयाशिवाय देशात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता खूप जास्त आहे. पंतप्रधान मोदींमधली ही एक कला आहे की ते जिथे जातात तिथे तिथल्या लोकांशी आपले नाते जोडतात. देवघरातून आज जे चित्र समोर आले आहे, ते पाहता काँग्रेस आणि राजदच्या चिंता नक्कीच वाढणार आहेत.
झारखंडमध्ये आघाडीचे सरकार
झारखंडमध्ये JMM-CONGRESS-RJD युतीचे सरकार आहे. झारखंड मुक्ती मोर्चाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री झाले. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत, ज्यामध्ये JMM 30, काँग्रेस 16, RJD एक आणि भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. आता ज्या पद्धतीने पीएम मोदी राज्याच्या राजकारणात आपली उपस्थिती नोंदवत आहेत त्यानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचं उदाहरण सगळ्यांनीच पाहिलं आहे.
झारखंड आघाडी सरकारमध्येही सर्व काही अलबेल आहे असे नाही. काँग्रेस नेते सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी झारखंड सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री करण्यात आलेल्या लोकांविरोधात जेएमएम पक्षाच्या आमदारांनी आघाडी उघडली होती.
देवघर येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः गेले होते. कुशीनगर विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळीही खुद्द पंतप्रधान मोदी तिथे पोहोचले होते. त्याचाच परिणाम असा झाला की, एकेकाळी बहुजन समाज पक्षाचा पट्टा मानल्या जाणाऱ्या सर्व 6 जागा भाजपच्या वाट्याला आल्या. देवघरमध्ये पंतप्रधान मोदींचे ज्या प्रकारे स्वागत झाले ते हेमंत सोरेन यांच्याही डोळ्यात खुपत असावे. देवघराला दिवाळीप्रमाणेच दिव्यांची सजावट करण्यात आली होती. एक दिवस आधी म्हणजे सोमवारीच देवघरातून चित्रे येत होती. ज्यामध्ये लोक त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावत होते. याचा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला होता.
JMM आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर
एक दिवसापूर्वीच भाजप आणि झामुमो यांच्यात संघर्ष झाला होता. पोस्टर वॉर सुरू झाले होते. संपूर्ण देवघर पीएम मोदींच्या पोस्टर्सने भरले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकीकडे भाजपने संपूर्ण शहर पंतप्रधानांच्या पोस्टर्स आणि पक्षाच्या झेंड्यांनी झाकले आहे, तर दुसरीकडे JMMनेही काही भागात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावले आहेत. 2024 च्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन करण्यासाठी भाजप सतत प्रयत्नशील आहे. पीएम मोदी आणि हेमंत सोरेन यांचा हा फोटो येथे काहीही शक्य असल्याचे दर्शवते.