नवी दिल्ली : देशभरात स्वतंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांची तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्याची तयारी करत आहेत. यातच पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून 15 ऑगस्टच्या भाषणासाठी काही सूचना मागवल्या आहेत. न्यू इंडियाबाबत आपलं मत नोंदवण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींनी केलं आहे. याचा उल्लेख पंतप्रधान मोदी 15 ऑगस्टच्या भाषणात करणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला निवडणुकीच्या आधीचं शेवटचं संबोधन असेल. जर 2019 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान झाले तरच ते पुन्हा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करु शकणार आहेत. 


पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन फक्त देशाला संबोधितच नाही करणार तर अनेक योजनांबद्दल माहिती देखील देतील. त्यांच्या सरकारने काय काय कामं केली हे मोदी यावेळी नमूद करतील. पंतप्रधान मोदींचं भाषण तयार करण्यासाठी अनेक तज्ज्ञ कामाला लागले आहेत. 5 वर्षातील सर्व योजनांची माहिती या भाषणातून पंतप्रधान मोदी देशासमोर ठेवतील.