नवी दिल्ली : राजकारणाच्या आणि त्यातही निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोपांच्या फैरी सुरू असताना दोन प्रमुख विरोधी नेत्यांमधला सुसंवादाचा प्रसंग तसा विरळाच. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात हा संवाद नुकताच घडला. भारतीय राजकाणरात दोन विरोधी नेत्यांनी सवाद साधणे यात फार काही विशेष नसले तरी, सध्या राजकिय वर्तुळात या संवादाची चर्चा चांगलीच रंगली आहे.


ट्विटरच्या माध्यमातूनच संवाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उभय नेते एकमेकांवर कसे तुटून पडले होते हे सर्वांनीच पाहिले. पण, भारतीय संस्कृतीनुसार दोघांनीही एकमेकांसोबत गोड संवाद केला आहे. त्याचे झाले असे, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. ही निवड झाल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींनी ट्विटरवरून खुल्या मनाने शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींनीही त्यांच्या या शुभेच्छांचा स्विकार तितक्याच खुल्या दिलाने केला. महत्त्वाचे असे की, दोघांनीही हा संवाद ट्विटरच्या माध्यमातूनच केला आहे.


राहुल गांधींना काय म्हणाले मोदी?


पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी राहुल गांधी यांना अध्यक्ष झालेबद्धल शुभेच्छा देतो. त्यांना शुभ कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा'



मोदींच्या शुभेच्छांवर राहुल गांधींची प्रतिक्रीया


पंतप्रधानांनी ट्विट करताच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही तत्काळ प्रतिसाद दिला. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, 'आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद मोदीजी.'



एकमेकांवर केली होती तीव्र टीका


दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात कॉंग्रेसने चांगलेच रान तापवले आहे. या पर्श्वभूमिवर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर तीव्र शब्दात हल्ला केला होता.