नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लोकं फेसबुक, ट्विटर आणि विविध माध्यमातून गिफ्टची मागणी करतात. पण आता पंतप्रधान मोदींना मिळालेले गिफ्ट तुम्हाला मिळण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेले गिफ्ट तुम्ही खरेदी करु शकता. मागील 4 वर्षामध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्टचा लिलाव केला जाणार आहे. हे सगळे भेटवस्तू दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट्समध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. या भेटवस्तूंच्या लिलावापासून मिळणाऱ्या रक्कमेचा वापर जन कल्याणासाठी वापरण्यात येणार आहेत.


सरकारकडून लिलाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 1900 भेटवस्तू मिळाल्या आहेत. हे सर्व ई-ऑक्शनमध्ये ठेवले जाणार आहेत. पंतप्रधान मोदींना मिळालेले विविध फेटे, पगडी, हाफ जॅकेट, पेंटिंग्स आणि इतर वस्तू देखील आहेत. शिवाय धाग्यापासून बनवलेली फ्रेम पेंटिंग, हनुमानाची गदा आणि सरदार पटेल यांच्या मॅटेलिक मूर्तीचा देखील यात समावेश आहे.


डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लिलाव


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटवस्तूंचा लिलाव डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होणार आहे. ऑनलाईन लिलावाची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होत आहे.


पंतप्रधान मोदींना जगभरातून मिळालेल्या वस्तू तुम्ही openauction.gov.in वर खरेदी करु शकता. यासाठी बोली देखील लागणार आहे. पीएमओने सगळ्या भेटवस्तूंची बेस प्राईस फिक्स केली आहे.


किती आहे किंमत?


पंतप्रधान मोदींना आतापर्यंत ज्या पगड्या मिळाल्या आहेत त्यांची किंमत 800 रुपये ठेवण्यात आली आहे. शॉलची बेस प्राइस 500 रुपये ठेवण्य़ात आली आहे. पेटिंग आणि फोटो फ्रेमची किंमत 500 रुपये ठेवण्यात आली आहे. 3 डी पेंटिंग, टेक्स्टाइल पेंटिंग, मंदिर, वुडन फ्रेम यांची किंमत 4 ते 5 हजारापर्यंत आहे.