नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक संकेत दिलेयत. पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सीनवर काम करणाऱ्या तीन कंपन्यांशी व्हर्चुअली बोलणी करत आणि वॅक्सिन बनवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली. पुण्याची जेनोवा बायो फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हैदराबादची बायलॉजिकल ई लिमिटेड आणि डॉ. रेड्डीज यांची लॅबोरेट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तीन कंपन्या वॅक्सिन ट्रायलच्या वेगवेगळ्या स्तरावर आहेत. यासंदर्भातील रिझल्ट येत्या वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींसोबत वॅक्सीन संदर्भात विविध शक्यतांवर चर्चा करण्यात आली. 


कायदेशीर प्रक्रिया आणि याप्रकरणी जोडलेल्या बाबी पूर्ण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी तिन्ही कंपन्यांना केले. वॅक्सिन आणि त्याच्या प्रभावासंदर्भात सर्वसाधारण जनतेला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करा असे पंतप्रधान म्हणाले. लसिकरणासंदर्भात लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट आणि कोल्ड चेन संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी कोरोना वायरस प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी वॅक्सिन बनवणाऱ्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामाची प्रशंसा केली. 



पंतप्रधानांनी शनिवारी वॅक्सिन तीन कंपन्यांचा दौरा केला होता. पंतप्रधानांनी पुण्यातील सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी सुरु असेलेले प्रयत्न, तयारी, आव्हान आणि भविष्यातील रोडमॅपची माहिती घेतली. ते अहमदाबादच्या जायडस बायोटेक पार्क आणि हैदराबादच्या भारत बायोटेक संस्थेत गेले आणि कोविड लसीकरणाच्या प्रगतीसंदर्भात माहिती घेतली. 


लवकरात लवकर वॅक्सिन विकसित करुन कोरोनाशी लढताना निष्काळजीपणा होऊ नये असे आवाहन पंतप्रधानांनी 'मन की बात' कार्यक्रमात म्हटले. साधारण १ वर्षापूर्वी आपल्याला कोरोना केस संदर्भात कळालं होतं. आतापर्यंत साऱ्या जगात चढउतार पाहायला मिळाले. लॉकडाऊनमधून बाहेर पडून आता वॅक्सिनवर चर्चा होऊ लागलीय. पण आता निष्काळजीपणा करुन चालणार नाही. ही लढाई आणखी मजबूत करावी लागेल असे पंतप्रधान म्हणाले.