नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या शुक्रवारी डॉ उर्जित पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातील अधिकार क्षेंत्राचा वाद टोकाला गेला आहे. सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तेतलाच हात घातल्याचा आरोप होतोय.


रिझर्व्ह बँकेचं निर्णय स्वांतत्र्य अबाधित राहिल असं सरकारनं स्पष्ट केलेलं असलं तरी अर्थमंत्रालयाचे अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांच्यात समाजमाध्यमामध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकी सुरूच होत्या. पंतप्रधान आणि गव्हर्नर यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर हा तणाव काहीसा निवळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


येत्या १९ तारखेला रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाची बैठक होते आहे. याबैठकीत सरकारकडून रिझर्व्ह बँकेवर टाकण्यात येणारा दबाव कमी होईल अशी चर्चा आहे. मुळात जे रिझर्व्ह बँकेच्या कार्यकक्षेत नाही, अशा गोष्टींसाठी सरकारकडून दबाव येत होता. त्या गोष्टी करणं कायद्याला धरून नसल्याचं सरकारी स्तरावर मान्य झाल्यानं आता तणाव हळहळू निवळेल असं बोललं जातंय.