नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक झाली. मात्र आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडक पवित्रा पहायला मिळाला. खासदारांच्या या बैठकीत संसदेतील उपस्थितीबद्दल आणि सार्वजनिक कामांमधील सहभागाबाबात पंतप्रधानांनी कमालीची नाराजी दाखवत भाजप खासदारांना खडेबोल सुनावले. रोस्टर ड्युटी लावली असताना जे खासदार यापुढे संसदेत उपस्थित राहणार नाहीत त्यांची माहिती देण्याचे आदेश संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पंतप्रधानांनी दिले आहेत. त्यामुळे जे मंत्री, खासदार आपल्या जनतेप्रती कर्तव्यापासून पलायन करतात त्यांना यापुढे मोदींना उत्तरे द्यावे लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'खासदारांच्या सभागृहातील उपस्थितीवरून पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली. संसदीय कार्यमंत्र्यांनी महत्वाच्या सत्रांची माहिती दिल्यानंतर दोन्ही सभागृहातील त्या सत्रांना उपस्थित राहणं अनिवार्य असल्याचं देखील मोदींनी खासदारांना सांगितलं. मंत्र्यांनी सार्वजनिक कामांमध्ये सहभागी व्हावं, सरकारी कामं आणि योजनांमध्ये पुढाकार घ्यावा. राजकारणाव्यतरिक्तही खासदारांनी काम करावीत. पाण्याचं संकट तीव्र होतं आहे. अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनतेच्या समस्या जाणून घ्या.' असं देखील मोदींनी खासदारांना सांगितलं आहे.


'खासदार आणि मंत्र्यांना संसदेत उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्या मतदारसंघासाठी नावीन्यपूर्ण कामं करा. जिल्हा प्रशासनासोबत काम करा. 
जनावरांच्या रोगराईबाबतही कामं करा. टीबी कोड अशा आजारावर मिशन तयार करुन कामं करा.' असं देखील मोदींनी खासदारांना म्हटलं आहे.