अगरताळा : पीएम नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरामध्ये सोनामुरा येथे रॅली केली. मुस्लीम बहुल भागात मोदींनी ही रॅली केली. भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.


मुस्लीम भागात सभा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूसरी खास गोष्ट म्हणजे ही सीट त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या विधानसभा मतदारसंघाला लागून आहे. माणिक सरकार धानापूर येथून निवडणूक लढवत आले आहेत. यामुळे सीपीएमच्या बालेकिल्ल्यात पीएम नरेंद्र मोदींनी थेट प्रचारसभा घेत खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. 18 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक होणार आहे. 3 मार्चला निकाल लागणार आहे.


लोकांना केलं आव्हान


त्रिपुराच्या जनतेला संबोधित करतांना पीएम मोदींनी म्हटलं की, तुम्हीच आम्हाला 'चोलो पलटाई' (चला बदल घडवूया') सांगितलं. आता वेळ आली आहे की, 20 वर्षापासून सत्‍तेवर असलेल्या या सरकारला हटवू. लेफ्ट सरकार गेल्यानंतर त्रिपुरामध्ये विकासाच्या युगाला सुरुवात होणार आहे.


माणिक 'सरकार'वर टीका


पीएम नरेंद्र मोदींनी म्हटलं की, जेव्हा जनता बोलते तेव्हा सरकार चुप होऊन जातात. त्रिपुरामध्ये विकासाचं युग येणार आहे. पीएम मोदींनी म्हटलं की, जादूगर सरकारने लोकांना बर्बाद केलं. आता त्रिपुराला अंधकारातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. 'माणिक सरकारने त्रिपुरा जनतेला धोका दिला. लोकांना पांढरा कुर्ता दाखवला. पण आत मधला काळा मळ नाही दाखवला.